CoronaVirus : आमदार कुटेंच्या आढावा बैठकीत सुरक्षीत अंतराची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 03:02 PM2020-03-20T15:02:08+5:302020-03-20T15:02:17+5:30

डॉ. संजय कुटे यांनी मतदारांघातील प्रशासनाच्या महत्वाच्या विभाग प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

CoronaVirus: Safe distance keeping during MlA Kute's review meetings | CoronaVirus : आमदार कुटेंच्या आढावा बैठकीत सुरक्षीत अंतराची खबरदारी

CoronaVirus : आमदार कुटेंच्या आढावा बैठकीत सुरक्षीत अंतराची खबरदारी

Next

जळगाव( जामोद) : कोरोना व्हायरस या आजराच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना आज आ. डॉ. संजय कुटे यांनी मतदारांघातील प्रशासनाच्या महत्वाच्या विभाग प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या प्रसंगी बैठकीच्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्या दरम्यान तिन फुटांचे अंतर असल्याची काळजी घेण्यात आली. 
येणारे 15 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत असे बोलत यावेळी बाहेरून जळगांव जामोद आणि संग्रामपूर परिसरात येणाऱ्या नागरिकांची कोणताही त्रास न होता काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असताना अधिकारी वर्गानी स्वतःची व सहकारी कर्मचाऱ्यांची, कार्यालयाची स्वच्छता याची काळजी घ्यावी असेही सांगितले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता फक्त जागरूक राहण्याची गरज असून 14 दिवस स्वतःला घरात आणि बाहेर च्या लोकांच्या संपर्कात न येता सांभाळ करावा तसेच, अफवांवर अजीबात विश्वास ठेवू नये. आपले हात स्वच्छ नेहमी धुत राहावे व गर्दीचे सर्व घरगुती कार्यक्रम टाळण्याचेही सूचीत केले. मतदार संघातील सर्वच स्तरावरील लोकप्रतीनिधींनी आपले कार्यक्रम रद्द करावे जेणेकरुन गर्दी होणार नाही आणि आजारा विषयी जनजागृती होईल.  जनतेकरीता तसेच अधिकारी वर्गाकरीता कोरोना आजाराच्या संदर्भामध्ये काही अडचणी आल्यास मी 24 तास दुरध्वनीव्दारे उपलब्ध आहे, त्याचबरोबर मतदार संघातील नागरीकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्यासच मला प्रत्यक्ष भेटावे अन्यथा दुरध्वनीव्दारेच माझ्याशी आपल्या कामासंदर्भात संपर्क करावा असे आवाहन आ. डॉ. संजय कुटे यांनी केले.

Web Title: CoronaVirus: Safe distance keeping during MlA Kute's review meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.