CoronaVirus : इंग्लडवरून परतलेल्या रुग्णामध्ये नवा स्ट्रेन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 11:54 IST2021-01-05T11:52:25+5:302021-01-05T11:54:32+5:30
CoronaVirus जनुकीय अवहाल साेमवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

CoronaVirus : इंग्लडवरून परतलेल्या रुग्णामध्ये नवा स्ट्रेन नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : इंग्लडवरून परतलेल्या खामगाव येथील दाेघांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला हाेता. त्यापैकी एका युवकाचा जनुकीय अवहाल साेमवारी प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. इंग्लंडवरून परतलेल्या खामगावमधील दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या हाेत्या. त्यामुळे या चाचण्या तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही ( राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा) येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्या हाेत्या. त्या पैकी एकाचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यामध्ये नवा स्ट्रेन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाॅझिटीव्ह आलेल्या एका युवकाचा अहवाल प्रतीक्षेत आहे. एका युवकाचा अहवालात नवा स्ट्रेन नसल्याने दिलासा मिळाला आहे.