CoronaVirus : मलकापूर बनले हॉटस्पॉट; आणखी दोन जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:45 AM2020-06-05T10:45:59+5:302020-06-05T10:46:54+5:30

मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे.

CoronaVirus: Malkapur becomes hotspot; Two more positive | CoronaVirus : मलकापूर बनले हॉटस्पॉट; आणखी दोन जण पॉझिटिव्ह

CoronaVirus : मलकापूर बनले हॉटस्पॉट; आणखी दोन जण पॉझिटिव्ह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर/साखरखेर्डा: बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सातत्याने वाढत असून आता जिल्ह्यात कोरोनाचे ७७ रुग्ण झाले असून पैकी २७ रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहे. प्रामुख्याने मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे.
दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथेही पाच रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर बुलडाणा येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहे. सिंदखेड राजा शहरातील महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सिंदखेड राजा तालुक्यात सध्या सहा अ‍ॅक्टीव्ह कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सध्या साखरखेर्डा आणि मलकापूर तालुक्यावर लक्ष लागून असून मलकापूर तालुक्यातील कोरानाबाधीतांची संख्या आता जवळपास १९ झाली आहे.
मलकापूर येथील मुक्ताईनगर मार्गावरील एक जण आणि धरणगाव येथील ७० वर्षीय महिला कोरोना बाधीत आढलून आल्या आहेत. त्यांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत असून प्रशासनाने मलकापूर तालुक्यावर सध्या अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. मुक्ताईनगरमधील रहिवाशी हा त्याच्या वाहनांद्वारे अकोला येथे मालवाहतूक करत होता तर कोरोनाग्रस्त ७० वर्षीय महिलेचा मुलगा हा कोरानाग्रस्त डॉक्टरकडे कामाला होता, ्शी माहिती समोर येत आहे.
दुसरीकड े सिंदखेड राजा शहरात यापूर्वी एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आला होता. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून तो परत आला होता. तो उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे सिंदखेड राजातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता काझी गल्लीतील महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने येथील नागरिकांची धाकधूक वाढली असून या बाधीत महिलेला ह्रदयरोग, मधुमेहही ्सल्याची माहिती आहे. सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुभाष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. यू. मेहेत्रे, डॉ. खान यांनी सतरा जणांना होमक्वारंटीन राहण्याचा सल्ला दिला असून ठाणेदार जयवंत सातव, पोलीस उपनिरीक्षक राम पारवे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधीत क्षेत्र सील केले असून सिंदखेड राजा पालिकेकडून येथे विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची नियमित आरोग्य पथकांद्वारे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्ह्यात आता प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये पुन्हा वाढ झाली असून जवळपास २७ प्रतिबंधीत क्षेत्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. सध्या परिस्थितीत प्रामुख्याने खामगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, मोताळा या तालुक्यांमध्े कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. त्यातल्या त्यात मलकापूर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण सातत्यो वाढत असून त्याचे समुह संक्रमणात रुपांतर होणार नाही, याची काळजी गरजेची आहे.

Web Title: CoronaVirus: Malkapur becomes hotspot; Two more positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.