शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Coronavirus : सैलानीत आरोग्य विभाग तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 1:00 PM

देशभरातून येणाऱ्या भाविकांना माघारी पाठवत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येथे रुग्णसेवा देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/पिंपळगाव सराई: येथील सैलानी बाबांची दरवर्षी भरणारी यात्रा कोरोना प्रतिबंधात्मक बाब म्हणून प्रशासनाने रद्द केली; परंतू तरीसुद्धा अद्यापही आरोग्य विभागाची चमू सैलानी येथे तळ ठोकून आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना माघारी पाठवत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येथे रुग्णसेवा देत आहेत.सैलानी यात्रा परिसरात आरोग्य विभागाचा कॅम्प असून पायदळ आलेले किंवा राना वनातून लपून छपून वाट काढत यात्रेकरू येतात. तेव्हा त्यांची आस्थेने विचारपूस आणि कोरोना बाबत जनजागृती करण्याचा उपक्रम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे. कोणीही घाबरून न जाता संकटाचा सामना करताना अफवा पासून रहावे, काय प्रतिबंध करावा, हात धुणे, गर्दीत न राहणे, यासह सर्दी, ताप, खोकला व इतर आजार बाबत रुग्ण सेवा देण्याचे काम येथे सुरू आहे. यात्रा रद्द झाली असली तरीही आरोग्य विभागाने आपली जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळत आपली रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे.मास्क, रुमाल बांधून न डगमगता दुरदूरून आलेल्या रुग्णांची विचारपूस केल्याने रुग्ण भयमुक्त होताना दिसतात.या यात्रेत जिल्हा भरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ड्यूट्या दिवस रात्र नेमून दिलेल्या आहेत. घाबरून न जाता काळजी घ्यावी - सांगळेराज्यातही ‘कोरोना’चे रुग्ण आढळून आले असल्याने बुलडाणा जिल्हा प्रशासनाकाडून याबाबत प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागासह इतर विभागाच्या समन्वयाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सैलानी येथे आरोग्य विभागाचे वतीने कॅम्प लावण्यात आला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या आजाराला घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी केले आहे.

सर्व वैद्यकीय चमू ‘कोरोना’ बाबत जनजागृती करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सैलानी दिवस रात्र आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे.- डॉ. प्रवीण निकस, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा