शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 2:12 PM

खामगाव, शेगाव व बुलडाणा येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्या ‘कोरोना’ आजाराने थैमान घातले आहे. बुलडाण्याला लागून असलेल्या अकोला जिल्ह्यात ‘कोरोना’ संशयीत रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये धास्ती भरली आहे. नागरिकांनी न घाबरता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. संसर्ग टाळण्यासाठी सतर्कता बाळगण्यात येत असून विशेष काळजी घेण्यात येत आहे.‘कोरोना हा जीवघेणा आजार आहे. या आजारावर आतापर्यंत कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध घालणे हाच महत्त्वाचा उपाय सद्य:स्थितीत आल्या हाती आहे. नागरिकांनी या आजाराला घाबरून न जाता संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींचे पालन करण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावे, कच्चे अन्नपदार्थ न खात पूर्णपणे शिजवून खावे आदी गोष्टींची काळजी घेतल्यास संभाव्य धोका निश्चितपणे टाळता येऊ शकतो. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्वरीत उपचार करून घेणे गरजेचे आहे. संशयीत रुग्णांसाठी जिल्ह्यात खामगाव, शेगाव व बुलडाणा येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘कोरोना’ ची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत या ठिकाणी जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. ‘कोरोना’ चा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो हस्तांदोलन करू नये. होळी खेळताना रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. महाराष्ट्रात आतापर्यंत या आजाराचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगण्याची गरज नाही.-डॉ. प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा

टॅग्स :corona virusकोरोनाbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव