CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांना रुग्णालयातून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:29 IST2020-04-29T10:29:09+5:302020-04-29T10:29:17+5:30
यामध्ये बुलडाणा येथील एक आणि मलकापूर येथील एकाचा समावेश आहे.

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांना रुग्णालयातून सुटी
बुलडाणा: एकीकडे बुलडाणा शहरात २७ एप्रिल रोजी तीन जण पॉझीटीव्ह आलेले असतानाच कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या दोघांना बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा येथील एक आणि मलकापूर येथील एकाचा समावेश आहे.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील २४ पैकी १७ जणांना आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे आता प्रत्यक्षात बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयामध्ये सहा जणांवर उपचार सुरू आहेत. या सहा जणांपैकीही दोघांची प्रसंगी परिस्थिती व रिपोर्ट अनुकूल आल्यास रुग्णालयातून सुटी होऊ शकते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.
मंगळवारी दुपारी बुलडाणा आणि मलकापूर येथील प्रत्येकी एकाला सुटी देण्यात आली. त्यांचे सलग दोन स्वॅब नमुने निगेटीव्ह आले होते. त्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, २७ एप्रिल रोजी बुलडाणा शहरात तीन जण पॉझीटीव्ह आढळल्यामुळे बुलडामा शहर कोरोना मुक्त होता होता राहून गेले. त्यामुळे आता आणखी २८ दिवस बुलडाणा शहरात रुग्ण न आढळल्यास बुलडाणा शहरातील लॉकडाउन संपण्यास मदत होऊ शकले.