CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू : २१८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 11:23 IST2020-09-16T11:23:06+5:302020-09-16T11:23:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील २१८ ...

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू : २१८ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील २१८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी २७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ५ हजार २५४वर पोहचली आहे. ४ हजार ३३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्याने १,१५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी जिल्ह्यात उपचारादरम्यान पोलीस लाईन, बुलडाणा येथील ५५ वर्षीय पुरूष व दे. माळी ता. मेहकर येथील ७५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नांदुरा शहरातील १०, नांदुरा तालुक्यातील तरवाडी १, वडनेर १, खामगांव तालुका जळका भडंग १, बोरजवळा १, वर्णा ३, घाटपुरी १, खामगांव शहर २३, जळगांव जामोद शहर ३, जळगांव जामोद तालुका : आसलगांव १, बुलडाणा शहर २३, वरवंड १, साखळी १, अजीसपूर २, केसापूर १, भादोला १, पळसखेड १, दाभा १, शेगांव शहर सहा , दे. राजा शहर १३, दे. राजा तालुका चिंचखेड १, धोत्रा ४, दे. मही १, रोहीखेड १, किन्ही पवार १, गोंधनखेड १, गारगुंडी २, चिखली तालुका सातगांव भुसारी २, भानखेड ३, वळती २, सावरगांव डुकरे १, दे. घुबे २, एकलारा १, जळी १, हेलगा १, चिखली शहर १३, मेहकर शहर २, मेहकर तालुका हिवरा आश्रम ४, मादनी १, उकळी १, डोणगांव १, जानेफळ १, मलकापूर तालुका वाघोळा १, झोडगा २,हिंगणा काझी १, कुंड २, धरणगांव ३, मलकापूर शहर १३, मोताळा शहर २, मोताळा तालुका सिं. लपाली २, बोराखेडी १, आव्हा १, धा. बढे २, लोणार शहर ४, जांभुळ २, पिंप्री खंडारे १, चिखला १, सुलतानूपर १,बिबी १, सि.राजा राहेरी १४, वारोडी ४, बारलींगा १, तांबेवाडी १, आंबेवाडी १, साखरखेर्डा २, जांभोरा ६, सिं.राजा शहर २, संग्रामपूर शहर २, टुनकी १ , बोडखा १ आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ६६ जणांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २४ हजार ९७ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत.आतापर्यंत चार हजार ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. १ हजार ४७४ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण पाच हजार २५४ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी चार हजार ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात १ हजार १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.