शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

CoronaVirus in Buldhana : तिघांचे नमुने निगेटिव्ह ; १६ नमुण्यांचे अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:50 AM

बुलडाण्यात आतापर्यंत पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देबुलढाणा जिल्ह्यातून आतापर्यंत ६९ जणांचे स्वाब नमुने पाठविण्यात आले होते.पैकी आतापर्यंत ५३ नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्याप सोळा नमुन्यांचे अहवाल बाकी आहेत.

बुलढाणा : शहरातील एकाचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या घेण्यात आलेल्या स्वॉब नमुण्यांपैकी तीघांचे अहवाल शुक्रवारी पहाटे प्राप्त झाले असून, या तींघांनाही कोरोना विषाणूची बाधा झालेली नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. अद्याप १६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. बुलडाण्यात आतापर्यंत पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यातून आतापर्यंत ६९ जणांचे स्वाब नमुने पाठविण्यात आले होते. पैकी आतापर्यंत ५३ नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्याप सोळा नमुन्यांचे अहवाल बाकी आहेत. वर्तमान स्थितीत बुलढाणा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच आहे. यातील एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मृत व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्तींचा समावेश आहे. गुरुवारी दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या १७ पैकी१५ जणांचे स्वाब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ११० संधीग्ध ची तपासणी करण्यात आली असून, १११ जण सध्या विलगीकरण कक्षामध्ये आहेत. दुसरीकडे बुलढाणा शहरातील हाय रिस्क झोनमधील २३ हजार ८१५ नागरिकांपैकी १४ हजार ५०० नागरिकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये चार हजार घरांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सर्दी आणि तापाचे लक्षण असलेल्या ५६ जणांवर आरोग्य विभागाने औषधोपचार सुरू केला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस