CoronaVirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या आठ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 09:59 AM2020-04-05T09:59:49+5:302020-04-05T10:00:04+5:30

खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे.

CoronaVirus in Buldhana: three more positives; Patient numbers at eight | CoronaVirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या आठ वर

CoronaVirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या आठ वर

Next

बुलडाणा : शहरातील एकाचा बळी घेतल्यानंतर कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, रविवारी आणखी तीघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा संख्या आता ८ झाली असून, यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील एकून ३० जण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॉब नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. यापैकी तिघांचे नमुणे पॉझिटिव्ह आले आहेत. १२ नमुणे निगेटिव्ह आले असून, १५ नमुणे अद्याप प्रलंबित आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून पाच मार्च पासून आजपर्यंत एकूण ८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापयंत ६३ जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत. कालपर्यंत ही संख्या ५३ होती. दरम्यान, यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझीटीव्ह आले होते. त्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे मृत व्यक्तीच्या निकट संपकार्तील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे शनिवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसगार्बाबत संदिग्ध म्हणून गणल्या गेलेल्या ११२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी शंका आलेल्या ८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. त्यातील २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यातील १२ नागरिक हे आयसोलेशन वॉर्डमध्ये (अलगीकरण कक्ष) आहेत. यातील सात जण बुलडाणा येथील, तीन जण खामगाव येथील तर दोन जण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहेत.

 

Web Title: CoronaVirus in Buldhana: three more positives; Patient numbers at eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.