CoronaVirus in Buldhana : कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू; १२४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:45 IST2020-09-25T09:45:12+5:302020-09-25T09:45:33+5:30
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून गुरूवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

CoronaVirus in Buldhana : कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू; १२४ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संक्रमाणाची व्याप्ती वाढत असतााच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून गुरूवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्याच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाचे संकट जिल्ह्यावर अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरूवारी एकूण १२४ जण कोरोना बाधीत आढळून आल्यामुळे एकूण बाधीतांची संख्या ही ६,२६८ झाली आहे.
गुरूवरी बुलडाणा शहरातील दोन, शेलगाव देशमुख येथील एक, निमगाव येथील एका पुरुषासह चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी एकाच दिवसी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या दोन घटना यापूर्वी घडल्या आहेत.
गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्या १२४ जणांच्या अहवालामध्ये खामगाव २२, घाटपुरी चार, गोंधनापूर दोन, बोर जवळा ११, निमगाव एक, नांदुरा दोन, वाघुड एक, मलकापूर तीन, पांग्रा डोळे दोन, हिरडव दोन, सुलतानपूर एक, लोणार एक, वरवट बकाल चार, जळगाव जामोद सात, सुनगाव एक, बुलडाणा २५, पांग्री दोन, डोंगरखंडाला दोन, चांडोळ एक, धाड एक, साखली एक, मोताळा एक , धामणगाव बढे चार, देऊळगाव राजा पाच, नारायण खेड दोन, दे. मही दोन, सुरा एक1, धोत्रा एक, कुंभारी एक, पांगरी एक, चिखली एक, दे. घुबे एक, शेलु एक, साखरखेर्डा एक, गोरेगाव एक, गुंज दोन, मेहकर दोन शेगाव एक, याप्रमाणे व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या.