Coronavirus in Buldhana : आणखी ५५ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,७४४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 19:03 IST2020-08-26T19:02:55+5:302020-08-26T19:03:03+5:30
बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४४० जणांचे अहवाल प्राप्त झाले.

Coronavirus in Buldhana : आणखी ५५ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,७४४
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सरासरी ५० कोरोना बाधीत रुग्ण दररोज सापडत असून मंगळवारीही जिल्ह्यात ५५ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या २,७४४ झाली आहे. दरम्यान, यापैकी ७६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४४० जणांचे अहवाल प्राप्त झाले.
बुधवारी ३८५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सागवन येथील एक, नांदुरा येथील तीन, खामगावमधील १२, देऊळगाव राजामधील एक, धोत्रा नंदई मधील एक, बीबी येथील नऊ, चिखली येथील तीन, किन्ही सवडत येथील एक, बुलडाण्यातील एक, मासरूळ येथील एक, मेहकर येथील १५, शेगाव येथील सहा, जलंब येथील एक या प्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.
४६ रुग्णांनी बुधवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात देऊळगाव राजा येथील एक, देऊळगाव मही येथील एक, बावनबीर येथील एक, बुलडाण्यातील सात, चांडोळ येथील एक, लोणार येथील एक, वरवट बकाल येथील एक, वडनेर भोलजी येथील एक, दिवठाणा येथील एक, मोताळा येथील एक, धामणगाव बढे येथील एक, दाताळा येथील एक, नांदुरा येथील चार, खामगावमधील सहा, शेगावमधील दोन, देऊळगाव राजा एक, चिखलीमधील एक, अमडापूर एक, शेलगाव आटोळ एक, सोनेवाडी एक, साखळी एक, साखरखेर्डा एक, सुलतानपूर सहा रुग्णांचा समावेश आहे.
२७ अहवालांची प्रतीक्षा
जिल्ह्यातील १६ हजार १८ संदिग्ध व्यक्तींचे अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले असून बाधीत रुग्णांपैकी १,९४१ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही एक हजार २७ संदिग्ध व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सध्या २,७४४ कोरोनाबाधीत रुग्ण असून त्यापैकी अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ७६१ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, ४२ कोरोना बाधीतांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.