CoronaVirus in Buldhana : आणखी ५२ पॉझिटिव्ह; ५० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:55 IST2020-08-17T10:55:24+5:302020-08-17T10:55:37+5:30
जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन हजार २३१ झाली आहे.

CoronaVirus in Buldhana : आणखी ५२ पॉझिटिव्ह; ५० जण कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात ५२ जण कोरोना बाधीत आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन हजार २३१ झाली आहे. तर रविवारी तब्बल ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
प्रयोगशाळा व रॅपीड टेस्ट मिळून एकूण ३४२ जणांची रविवारी तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर २९० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. पॉझिटिव्ह अहवालामध्ये मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथे एक, मेहकरमध्ये चार, खामगावमध्ये सात, चिखलीमध्ये एक, शेळगाव आटोळ येथे एक, सोनेवाडी येथे चार, पिंपळगाव काळे येथे एक, माळेगाव एक, बोराखेडी एक, धामणगाव बढे येथे दोन, हतेडी एक, मोहोज एक, बुलडाणा तीन, शेगाव एक, जलंब एक, लोणार एक, मलकापूरमधील जाधववाडीमध्ये पाच, देऊळगाव राजात तीन, देऊळगाव राजातीलच उंबरखेड येथील एक, नांदुरा येथील चार, सिंदखेड राजातील हिवरखेड येथे तीन, पुण्यातील गोलोरेपार्क, बावधन येथील एक, अमरावती जिल्ह्यातील सिराजगाव येथील एक, अकोला येथील दोन जणांचा समावेश आहे.
दुसरीकडे ५० रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा सहा, धाड सहा, शेगाव दोन, जळगाव जामोद एक, लोणार पाच, खळेगाव एक, बानापूर तीन, दहीफळ एक, सुलतानपूर एक, मेहकर चार, कळंबेश्वर एक, खामगावमधील १९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १,३५३ कोरोनाबाधीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त १४ हजार १३२ संदिग्ध रुग्णांचेही अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. अद्यापही १६८ जणांच्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार २३१ झाली असून सध्या एकूण रुग्णांपैकी अॅक्टीव असलेल्या ८३८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून मृतकांची संख्या ५० च्या टप्प्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनी झाला दोघांचा मृत्यू
स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देऊळगाव मही येथील ५२ वर्षीय व्यक्ती व मलकापूर येथील ७१ वर्षीय व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातून कोरोना मृत्यूची संख्या ४० झाली आहे. स्वातंत्र्य दिनी ५३ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. दोन दिवसात जिल्ह्यात ८५ जण बाधीत आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.