Corona Cases in Buldhana : कोरोनाचा आलेख घसरला, केवळ ४० सक्रीय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:51 IST2021-07-14T11:50:39+5:302021-07-14T11:51:00+5:30
Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

Corona Cases in Buldhana : कोरोनाचा आलेख घसरला, केवळ ४० सक्रीय रुग्ण
- नीलेश जाेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या १५ महिन्यातील कोरोनाचे संक्रमण आता जिल्ह्यात निच्चांकी पातलीवर आले असून जुलै महिन्याच्या पहिल्या १२ दिवसात अवघ् ४४६ जण कोरोना बाधीत आढळून आले असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले असल्याचे एकंदरीत चित्र आहे.गेल्या १५ महिन्याचा विचार करता आतापर्यंत ७ लाख २ हजार ८६८ संदिग्धांच्या तपासण्यास करण्यात आल्या असून त्यामध्ये ८७ हजार १३९ जण कोरोना बाधित आढळून आले आहे. सोबतच ६६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २०२१ या वर्षाचा विचार करता जानेवारीच्या तुलनेत अवघे ३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन, कठोर निर्बंध व बाजारपेठेला मर्यादीत स्वरुपात देण्यात आलेली सुट यामुळे कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात नियंत्रणात आला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत जुलै महिन्यात अवघे २.१० टक्केच कोरोना बाधीत रुग्ण तपासणीत आढळले. सध्या अवघे ४० सक्रीय रुग्ण आहेत.