कोरोनापाठोपाठ डेंग्यूचे रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST2021-05-18T04:36:22+5:302021-05-18T04:36:22+5:30
साखरखेर्डा येथे आजही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण गंभीर नाहीत, ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांना ...

कोरोनापाठोपाठ डेंग्यूचे रुग्ण आढळले
साखरखेर्डा येथे आजही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण गंभीर नाहीत, ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांना होमक्वारंटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी दिला आहे; परंतु ते रुग्ण तोंडाला रुमाल किंवा मास्क लावत नाहीत. उलट गावात फिरताना आढळून येत आहेत. सहकार विद्यामंदिरात कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले असताना आजपर्यंत एकही रुग्ण या कक्षात दाखल झाला नाही. याची दखल त्यांच्या नातेवाइकांनी घेऊन कोरोना साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्राम विकास अधिकारी रामेश्वर आढाव यांनी केले आहे. त्याचबरोबर वाॅर्ड क्रमांक एकमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांना ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने १६ मे रोजी ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम शहा, कर्मचारी रवी कुळकर्णी, श्रीपाद अंबास्कर, शांताराम गवई, अशोक राजपूत यांनी जंतूनाशक द्रव्यांची फवारणी केली आहे.