शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात ...

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यानंतरही काहींनी मंदिरामध्ये तर काहींनी शेतात लग्न पार पाडले आहे. शहरात दरवर्षी किमान एक हजारपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्या वेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले तहसीलदार, नगरपालिका, पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पाडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू-वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

चालू महिन्यातील लग्न तारखा ढकलल्या पुढे

बुलडाणा शहरात लहान, मोठी २८ मंगल कार्यालये, लॉन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

२६८ जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेज

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलाविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू-वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०२० मध्ये २६८ जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली. तर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत १३० विवाह झाले असून, १४४ अर्ज प्राप्त आहेत.

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर गदा आलेली आहे. त्यातच लग्न, मुंज हे कार्यक्रम म्हणजे कुटुंबाच्या आनंदामध्ये त्याचबरोबर जगण्यामध्ये बळ देण्याचे काम करतात. पण कोरोनामुळे यावर विरजण पडले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, त्याचबरोबर केटरर्स, स्वयंपाकी आणि कामगार या सगळ्यांवरच मोठे संकट ओढवलेले आहे. कार्यालयाची मर्यादा एकदम कमी करण्यात आलेली आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालय पंचवीस माणसांसाठी किंवा पन्नास माणसांसाठी घेणे परवडत नाही. लोकांकडून घेतलेले ॲडव्हान्स परत करावे लागले. काहींनी भाडेतत्त्वावर मंगल कार्यालये घेतलेले आहेत त्यांचीही पंचाईत झालेली आहे.

- बबन परांजपे, मंगल कार्यालय चालक, बुलडाणा