कोरोना : चिखलीतील दोघांचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST2021-01-08T05:51:59+5:302021-01-08T05:51:59+5:30

दरम्यान, बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सिंदखेड राजा येथील एक, पळशी येथील एक, खामगाव दोन, चिखली एक, दाभाडी एक, मोताला दोन, ...

Corona: Two killed in mudslide, 23 positive | कोरोना : चिखलीतील दोघांचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

कोरोना : चिखलीतील दोघांचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

दरम्यान, बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सिंदखेड राजा येथील एक, पळशी येथील एक, खामगाव दोन, चिखली एक, दाभाडी एक, मोताला दोन, बुलडाणा दोन, नांदुरा एक, अवधा बुद्रूक एक, शेगाव नऊ, जवळपा एक, भोनगावमधील एकाचा समावेश आहे. दरम्यान, चिखली येथील ७० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत चिखली शहरात कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

दुरीकडे बुधवारी २९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून १२, देऊळगाव राजा तीन, चिखली चार, खामगाव नऊ आणि मोताळा येथील कोविड केअर सेंटरमधून एकाला सुटी देण्यात आली. यासोबतच आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संधिग्दांपैकी ९२ हजार २८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२ हजार २८९ कोरोनाबाधितांनी आतार्पंत कोरोनावर मात केली आहे.

७७१ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा

बुधवारी तपासणी करण्यात आलेल्या ७७१ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १२ हजार ८०२ झाली आहे. यापैकी ३५८ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. चिखली येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १५५ झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: Corona: Two killed in mudslide, 23 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.