कोरोना अहवाल आता थेट रूग्णाच्या मोबाईलवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 16:32 IST2021-08-25T16:30:04+5:302021-08-25T16:32:54+5:30

Corona report now directly on patient's mobile : खामगाव येथील सामान्य रूग्णालय प्रशानाने चक्क कोरोना अहवाल मोबाईलवर देण्यास सुरूवात केली आहे.

Corona report now directly on patient's mobile! | कोरोना अहवाल आता थेट रूग्णाच्या मोबाईलवर!

कोरोना अहवाल आता थेट रूग्णाच्या मोबाईलवर!

ठळक मुद्दे  रूग्ण आणि नातेवाईकांचे हेलपाटे वाचणार

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत ‘निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह’ होण्यासाठी स्बॅव खरेदी विक्रीचे गंभीर प्रकार चव्हाट्यावर आले. या कटू अनुभवातून बोध घेत, खामगाव येथील सामान्य रूग्णालय प्रशानाने चक्क कोरोना अहवाल मोबाईलवर देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्रास वाचणार असून, स्वॅब खरेदी-विक्रीच्या प्रकारावर नियंत्रण आणण्यास निश्चितच मदत होईल.
कोरोना विषाणू संसर्गाच्या गंभीर आजाराच्या कालावधीत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात स्वॅब खरेदी-विक्रीचा गंभीर प्रकार समोर आला. खामगाव येथील शिवांगी बेकर्स मधील तब्बल शंभरापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी ‘निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह’होण्यासाठी कोरोना स्वॅबची खरेदी केली. या स्वॅबद्वारे विम्याचा लाभ मिळविला. त्यामुळे सजग होत उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने आता कोरोना तपासणी अहवाल आता थेट रूग्णांच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर देण्यास सुरूवात केली आहे. संदेशाची लिंक आणि क्यू-आर कोड संबंधितास उपलब्ध होणार असल्याने, रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्रास वाचेल. सोबतच इतर देश-विदेशात प्रवास करताना हे प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाईल. याशिवाय कोरोना तपासणी अहवालाची प्रतीक्षाही आता थांबेल. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाला वेळेवर उपचार घेणे शक्य होईल.
 
कोरोन अहवालासाठी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची पायपीट आता थांबणार आहे. कोरोना तपासणी केल्यानंतर संबंधित अहवालाचा संदेश थेट रूग्णाच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर जाईल व लिंकही दिली जाईल. त्यामुळे रुग्णांना आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. बुलडाणा जिल्ह्यात एकमेव खामगाव उपजिल्हा रूग्णालयाने हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
-डॉ. नीलेश टापरे
निवासी वैद्यकीय, अधिकारी, खामगाव.

Web Title: Corona report now directly on patient's mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.