कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू, १२६४ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:13+5:302021-04-26T04:31:13+5:30
बुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात रविवारी ८ जणांचा मृत्यू झाला असून, १,२६४ जण कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत ...

कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू, १२६४ जण पॉझिटिव्ह
बुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात रविवारी ८ जणांचा मृत्यू झाला असून, १,२६४ जण कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी ८ हजार ६१ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ७,७९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे विदारक चित्र आहे.
दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात ३४३, खामगावमध्ये ६८, शेगावमध्ये ४५, देऊळगाव राजामध्ये २६, चिखलीमध्ये ९५, मेहकरमध्ये १८३, मलकापूरमध्ये ६७, नांदुऱ्यामध्ये १०५, लोणारमध्ये ९४, मोताळ्यात १३५, जळगाव जामोदमध्ये ३७, सिंदखेड राजामध्ये ५३ आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये १३ जण बाधित आढळले आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार ७९ झाली असून, आतापर्यंत त्यापैकी ५१ हजार ४१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ७ हजार २९१ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, रविवारी आठजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३७३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजपर्यंत तपासणी केलेल्यांपैकी ३ लाख ९१ हजार ७४७ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३ लाख ४० हजार ३३२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.