शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात आतापर्यंत ४०५ बालकांना कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:43 IST

Corona Cases in Malkapur : पहिल्या लाटेत ११४ तर दुसऱ्या लाटेत २९१ अशा एकूण ४०५ बालकांना संसर्ग झाला आहे.

- अनिल गोठीलोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर :  गेल्या काळात शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक होती. तसेच तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट उद्भवल्यास लहान मुलांना त्याची बाधा होण्याची शक्यता असतानाच आतापर्यंत मलकापूर शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ४०५ बालकांचा समावेश असल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे.गतवर्षापासून उद्भवलेल्या कोरोना महामारीची पहिली लाट वयोवृद्धांना त्रासदायक ठरली. तर दुसरी लाट असताना कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या व विविध औषधी, उपचार सामग्रीचा तुटवडा या कारणांमुळे खूपच भयावह ठरली, परंतु शासनाने योग्यवेळी विविध निर्बंध व उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यातच तज्ज्ञांच्या मते काळजी घेतली नाही तर  तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता आहे. त्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे. उपजिल्हा रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार शहरातील कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ११४ तर दुसऱ्या लाटेत २९१ अशा एकूण ४०५ बालकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात सतर्क राहून लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मुलांना घराबाहेर शक्यतो पाठविण्याचे टाळावे.

मागील वर्षी कोरोना संसर्गाचा धोका हा वयोवृद्धांना जास्त पाहायला मिळाला,  परंतु दुसऱ्या लाटेची परिस्थिती पाहता यामध्ये तरुणांना सुद्धा जास्त प्रमाणावर संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच यामध्ये लहान बालकांची संख्या पाहता नागरिकांना योग्य ते उपाययोजना व काळजी घेणे गरजेचे आहे.  - डॉ. पुरुषोत्तम पाटील, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मलकापूर 

टॅग्स :MalkapurमलकापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस