केळवद येथे कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:43 IST2021-02-25T04:43:53+5:302021-02-25T04:43:53+5:30
कोरोनाचे आगमन झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पहिला रुग्ण गावात आढळून आला होता. त्यानंतर, आता या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गावातील ...

केळवद येथे कोरोनाचा उद्रेक
कोरोनाचे आगमन झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पहिला रुग्ण गावात आढळून आला होता. त्यानंतर, आता या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गावातील वाढती रुग्णसंख्या थांबविण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना म्हणून गावातील आजारी रुग्णांची गावातच रुग्ण तपासणी करण्यात आली. यावेळी ४१ रुग्ण तपासले गेल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश सदावर्ते यांनी सांगितले. केळवद सरपंच नर्मदाबाई गवई, उपसरपंच कडूबा पाटील, ग्रामसेवक ठेंग तर सदस्य नंदुआप्पा बोरबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पाटील, बाळूहिवाळे, गंगागीर गिरी तर आरोग्य पथकातील डॉक्टर आकाश सदावर्ते, डॉ.भाग्यश्री खेडेकर, विजय जाधव, सतीश इंगळे, रवी डुकरे, रंजनाबाई खराटे, रेखा हिवाळे, नेहा राजमाने आदींची उपस्थिती होती. गावातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तत्पर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.