कोरोना : राजेगावातील महिलेचा मृत्यू, ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:52+5:302021-02-13T04:33:52+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १८, अंचरवाडी दोन, शेलूद एक, पिंपळगाव एक, जांभोरा एक, किन्होळा एक, भालगाव एक, देऊळगाव राजा ...

कोरोना : राजेगावातील महिलेचा मृत्यू, ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १८, अंचरवाडी दोन, शेलूद एक, पिंपळगाव एक, जांभोरा एक, किन्होळा एक, भालगाव एक, देऊळगाव राजा नऊ, गिरोली बुद्वाद्लरूक एक, लिंबा एक, गारखेडा एक, गारगुंडी एक, आळंद एक, सि. राजा एक, साखरखेर्पुडा एक, मलकापूर पांग्लग्प्ररा एक, मोहाडी एक, राजेगाव एक, हिवरा खुर्द एक, लोणार एक, सुंदरखेड दोन, रुईखेड एक, सागवन एक, वरवंड दोन, बुलडाणा १७, जळगांव जामोद एक, वाडी एक, खामगाव एक, घाटपुरी एक, दोंदवडा एक, मलकापूर तीन, नांदुरा एक, आणि जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील एका संशयिताचा यात समावेश आहे. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या ही १७५ झाली आहे. दुसरीकडे शुक्रवारी ५८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये खामगाव कोविड केअर सेंटरमधून १४, चिखली एक, देऊळगाव राजा १२, बुलडाणा १०, लोणार सात, शेगाव दोन चिखली ९, मेहकर कोविड केअर सेंटरमधील दोन जणांचा यात समोश आहे.
याव्यतिरिक्त आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १४ हजार ५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १४ हजार १२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबतच ८१२ संदिग्धांच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या १४ हजार ६१४ झाली आहे. यापैकी ४२७ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.