कोरोना: एकाचा मृत्यू, ३२१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:50+5:302021-03-04T05:05:50+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथील ३५, दुधा येथील एक, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, वरवंड येथील सात, उमाळा एक, ...

कोरोना: एकाचा मृत्यू, ३२१ पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथील ३५, दुधा येथील एक, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, वरवंड येथील सात, उमाळा एक, डोंगर खंडाळा येथील दोन, दहीद बुद्रूक येथील तीन, रायपूर येथील दोन, मढ येथील दोन, सागवन एक, भालगाव दोन, सवणा चार, केळवद एक, वळती चार, भरोसा दोन, शेलूद एक आमखेड तीन, हातणी दोन, माळशेंबा एक, मंगरूळ ेक, बेराळा दोन, टाकरखेड हेलगा सहा, देऊळगाव धनगर एक, खंडाळा दोन, वरूड एक, चिखली १२, सि. राजा सात, साखरखेर्डा तीन, खरबडी एक, शेलापूर एक, खामगाव १५, गोंधनापूर तीन, जयपुर लांडे एक, अंत्रज १९, उमरा चार, शिरलाोक, देऊळगाव राजा तीन, देऊळगाव मही एक, उंबरखेड एक, अंढेरा तीन, बायगाव एक, सुरा दोन, धोत्रा नंदई एक, मेहकर २२, जानेफळ २७, डोणगाव तीन, शहापूर दोन, थार एक, कळमेश्वर दोन, मलकापूर ३४, विवरा एक, उमाळी एक, नांदुरा १६, पोटळी एक, पातोंडा दोन, आलमपूर एक, चांदुरबिस्वा पाच, खैरा एक, हिरडव दोन, लोणार तीन, वडशिंगी एक, खांडवी एक, जळगाव जामोद एक, शेगाव २०, भोनगाव एक, जलंब एक, मोताळा एक, जळगाव खान्देश जिल्ह्यातील भुसावळ येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान मेहकर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
बुधवारी २९४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत १६,७१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
--२६२७ सक्रिय रुग्ण--
सध्या जिल्ह्यात २,६२७ सक्रीय रुग्ण असून एकूण बाधितांची संख्या १९ हजार ५३४ झाली आहे. अद्याप ८,५९२ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १ लाख ४१ हजार ९९७ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १९५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.