Corona Cases in Buldhana : ९ तालुक्यात एकही पाॅझिटीव्ह नाही; १३ नवे पाॅझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 19:52 IST2021-06-28T19:52:30+5:302021-06-28T19:52:35+5:30
Corona Cases in Buldhana: चार तालुक्यामध्ये १३ नवे पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत़.

Corona Cases in Buldhana : ९ तालुक्यात एकही पाॅझिटीव्ह नाही; १३ नवे पाॅझिटीव्ह
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून ९ तालुक्यामध्ये साेमवारी एकही पाॅझिटीव्ह आढळला नाही़. तसेच चार तालुक्यामध्ये १३ नवे पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत़. तसेच २४ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ तसेच उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे भंडारी ता. सिं.राजा येथील ६५वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ३, तालुका नांद्राकोळी १, शेगांव शहर २, सिं. राजा तालुका चांगेफळ १, चिखली तालुका शेलसूर १, मेहकर तालुका भोसा १, लोणार तालुका शेलगांव जहागीर १, खामगांव शहर १, खामगांव तालुका तांबुलवाडी १, परजिल्हा माहोरा ता. जाफ्राबाद येथील एका रुग्णाचा समावेश आहे़.
११० रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी ११०३ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५ लाख ६७ हजार ४९६ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार ६१२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५ हजार ८४१ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ११० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६६१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.