Corona Cases in Buldhana :  एकाचा मृत्यू, ३७ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:12 IST2021-06-17T12:12:38+5:302021-06-17T12:12:43+5:30

Corona Cases in Buldhana :  जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून तपासणीमध्ये ३७ जण कोरोना बाधित आढळून आले.

Corona Cases in Buldhana: Death of one, 37 positive | Corona Cases in Buldhana :  एकाचा मृत्यू, ३७ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana :  एकाचा मृत्यू, ३७ जण पॉझिटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून तपासणीमध्ये ३७ जण कोरोना बाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ६२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ५९० संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील पाच, खामगाव सात, शेगाव एक, देऊळगाव राजा दोन, चिखली पाच, मेहकर एक, मलकापूर एक, नांदुरा चार, लोणार तीन, जळगाव जामोद सहा, सिंदखेड राजा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. दरम्यान मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधीत आढळून आलेला नाही.
उपचारादरम्यान जिखली तालुक्यातील पिंपळगाव येथील ८४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ६० बाधिकांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना १६ जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ३७ हजार २८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच एकुण बाधितांपैकी आजपर्यंत ८५ हजार ३१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Corona Cases in Buldhana: Death of one, 37 positive