Corona Cases in Buldhana : आणखी दाेघांचा मृत्यू, ८९ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:10 IST2021-06-08T11:10:19+5:302021-06-08T11:10:24+5:30
Corona Cases in Buldhana: साेमवारी केवळ ८९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Corona Cases in Buldhana : आणखी दाेघांचा मृत्यू, ८९ पाॅझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी केवळ ८९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २ हजार ११९ अहवाल निगेटिव्ह आले असून, १९३ जणांनी काेराेनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ०४, बुलडाणा तालुका १०, मोताळा तालुका ०३, खामगांव शहर ०१, खामगांव तालुका ०२, शेगांव शहर ०४, शेगांव तालुका ०२, दे. राजा शहर ०१, दे. राजा तालुका १०, चिखली शहर ०२, चिखली तालुका ०३, संग्रामपूर तालुका ०९, सिं. राजा तालुका ०४, मेहकर शहर ०१ , मेहकर तालुका ०९, जळगाव जामोद शहर ०१, जळगांव जामोद तालुका : जामोद ०१, नांदुरा शहर ०५, नांदुरा तालुका ०४, लोणार शहर ०१, लोणार तालुका ०४, परजिल्ह्यातील ४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. उपचारादरम्यान चिखली येथील ८० वर्षीय पुरुष व काटोडा ता. चिखली येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तसेच आजपर्यंत ५ लाख ६ हजार ५३९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज अखेर एकूण ८५ हजार ६१९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ८६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत ६३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.