शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू, १२२८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:22 AM

Corona Cases in Buldhana : शुक्रवारी ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर १२२८ जण कोरोना बाधित झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कठोर निर्बंधांच्या काळातही कोरोना संक्रमणाची व्याप्ती वाढत असून शुक्रवारी ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर १२२८ जण कोरोना बाधित झाले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६२६० जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये बुलडाणा तालुक्यात १८६, खामगाव ९७, शेगाव ११७, दे. राजा ११६, चिखली १०८, मेहकर १०७, मलकापूर ७८, नांदुरा १३३, लोणार ९१, मोताळा ४६, जळगाव जामोद ६७, सि. राजा ५६, संग्रामपूरातील २६ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील गेरू येथील ५५ वर्षीय महिला, खामगावातील शेलगाव नाका येथील ५० वर्षीय महिला, उंबरा येथील ५५ वर्षीय महिला,  सरंबा येथील ८० वर्षीय महिला, मेहकरमधील  ४५ वर्षीय पुरुष, हिवरा आश्रम येथील ५८ वर्षीय महिला, बुलाडण्यातील ८१  वर्षीय पुरूष आणि ५५ वर्षीय महिला, चिखलीमधील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी ५८९ जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या