शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : एसटीच्या बुलडाणा विभागाला चार कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 09:02 IST

एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला जवळपास चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपायोजना म्हणून राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे गत दहा दिवसांपासून लालपरीची चाके थांबलेली आहेत. परिणामी आतापर्यंत एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला जवळपास चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आणखी १५ एप्रिलपर्यंत सेवा बंद राहणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून एसटी महामंडाची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. गत दहा दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. एसटी बस डेपोतच असल्याने महामंडळाला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. बुलडाणा विभागाचे दररोजचे उत्पन्न ३५ ते ४० लाख आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून सेवा बंद असल्याने नुकसान जवळपाच ४ कोटींच्या घरात गेले आहे. नादुरुस्त बसेस व इतर कारणांमुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खूप मोठी आर्थिक झळ बसली आहे. हे सर्व वास्तव असले तरी सद्य:स्थितीत प्रसार रोखण्यासाठी सेवा बंद ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. कारण एसटी बसमध्ये सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळणे शक्य नाही. एसटी बस सुरू झाल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता आर्थिक झळ सोसल्याशिवाय शासन तथा एसटी महामंडळाकडे कोणताही पर्याय सध्या उरलेला नाही.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडल्यास सोशल डिस्टंसिंग ठेवावे. एसटी बसमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य नाही. त्यामुळे बुलडाणा विभागातील ४३० शेड्यूल पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.- संदीप रायलवार,विभाग नियंत्रक बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस