कोरोना: पुस्तक विक्रेत्यांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:57 AM2020-07-18T10:57:31+5:302020-07-18T10:58:04+5:30

विद्यार्थी व पालकांनी पुस्तक खरेदीकडे पाठ फिरविल्याने पुस्तक विक्रेत्यांचा संपूर्ण व्यवहारच ठप्प झाला आहे.

Corona: Book sellers hit billions | कोरोना: पुस्तक विक्रेत्यांना कोट्यवधींचा फटका

कोरोना: पुस्तक विक्रेत्यांना कोट्यवधींचा फटका

googlenewsNext

- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनामुळे सर्वात जास्त फटका पुस्तक, बूक विक्रेत्यांना बसला असून, कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी शाळा केव्हा सुरू होणार याची शास्वती नसल्याने विद्यार्थी व पालकांनी पुस्तक खरेदीकडे पाठ फिरविल्याने पुस्तक विक्रेत्यांचा संपूर्ण व्यवहारच ठप्प झाला आहे.
जिल्ह्यात पुस्तक, बूक, जनरल स्टोअर्सची अनेक दुकाने आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. विद्यार्थी व पालक पुस्तकांसोबतच, बूक, रजिस्टर, पेन, पेन्सील, स्कूलबॅग, शाळेचा गणवेश, बूट खरेदी करतात. जून व जुलै महिन्यात या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी असते. संपूर्ण वर्षभरात या दोन महिन्यातच या व्यावसायिकांचा सर्वात जास्त व्यवसाय होतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे. अनेक छोटे व्यापारी दुकानांचे भाडेही देऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू वगळता बहूतांश दुकाने सुरू झाली. मात्र, त्याचा पुस्तक विक्रेत्यांची दुकाने सुरू झाली असली तरी त्यांना काहीच फायदा झाला नाही. अशा परिस्थितीतही व्यापारी आपली दुकाने चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बँकेचे कर्ज, दुकान भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण झाले आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की कोरोना आणखी किती दिवस राहील यावर पुस्तक विक्रेत्यांचा व्यवसाय अवलंबून आहे.


अनेक पुस्तके विक्रेत्यांनी व्यवसाय बदलला
पुस्तकांची विक्री यावर्षी होणार नाही, याची शाश्वती व्यावसायिकांना आल्याने अनेकांनी पुस्तकांच्या दुकानामध्ये सॅनिटायझर, मास्क विक्री सुरू केली आहे. तर काहींनी जनरल स्टोअर्स सुरू केले आहे. तर ग्रामीण भागात अनेक दुकानदारांनी किराणा दुकाने सुरू केली आहेत.


खरेदी केलेली पुस्तके दुकानात पडून
अनेक व्यावसायिकांनी लाखो रूपयांची पुस्तके, बूक व शालेय साहित्य खरेदी केले आहे. तसेच काहींनी नोंदणी करून ठेवले आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे पैसे अडकले असून, विक्री ठप्प झाली आहे.


काँन्व्हेंटमध्ये पुस्तके व गणवेश देणाºया व्यावसायिकांचेही नुकसान
अनेक कॉन्व्हेंटचे मालक त्यांच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके ठोकमध्ये खरेदी करून विद्यार्थ्यांना देतात. त्याकरिता गणवेश तयार करणारे तसेच पुस्तक विक्रेते व्यापाºयांना कॉन्ट्रक्ट देण्यात येतो. त्यामुळे व्यावसायिकांना लाखोंचा फायदा होतो. यावर्षी मात्र सदर कॉन्ट्रक्ट देण्यात आले नसल्यामुळे व्यापाºयांचे नुकसान झाले आहे.


आम्ही विक्रीसाठी पुस्तके खरेदी केलेली आहेत. मात्र, शाळा सुरू न झाल्यामुळे तसेच कोरोनामुळे विद्यार्थी व पालक पुस्तक खरेदी करीत नाहीत. परिणामी संपूर्ण व्यवसायच ठप्प आहे. पुस्तक विक्रेत्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. खामगाव शहरातच १ ते २ कोटींचा व्यवसाय होतो.
- अशोक मोरानी
पुस्तक विक्रेता, खामगाव.

Web Title: Corona: Book sellers hit billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.