धरणांना पडली कोरड!

By Admin | Updated: July 30, 2015 23:25 IST2015-07-30T23:25:00+5:302015-07-30T23:25:00+5:30

दोन महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील पाऊस गायब; जलसाठय़ात झपाट्याने घट.

Corals fell on the dams! | धरणांना पडली कोरड!

धरणांना पडली कोरड!

बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी आतापर्यंत सरासरी एक आठवडा पाऊस झाला. त्यानंतर २0 जूनपासून पाऊस बेपत्ता झाला, तर गत २६ व २७ जुलै या दिवशी काही तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम व ७४ लघ प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, जिल्ह्यातील धरणे अद्यापही तहानलेली आहेत.
जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. त्यानंतर कमी-जास्त प्रमाणात एक आठवडा पाऊस पडला व २0 जूननंतर आतापर्यंत पावसाने खंड दिला आहे. १३ जूननंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पाच्या पातळीत नगण्य वाढ झाली व ही वाढ तेवढय़ाच झपाट्याने कमी होत आहे. २५ आणि २८ जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे धरणांची तहान भागली नाही. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी २३.१६ टक्के जलसाठा होता. आता ३५.९९ टक्के आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांत महिन्यापूर्वी २0.५२ टक्के जलसाठा होता. आता २९.४४ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७४ लघुप्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी ७.९१ टक्के जलसाठा होता. आता १२.१३ टक्केच जलसाठा वाढला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठय़ाची जी स्थिती होती, त्यात नगण्य वाढ झाली आहे; परंतु पावसाचा खंड वाढल्यास या प्रकल्पांतील पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १८.२४ जलसाठा आहे. ही २४.४३ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत १४.0६ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी २३.६0 आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ५0.0३ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ४३.६४ आहे. सदर जलसाठा पावसाने दडी मारल्याने तसेच पाण्याचा वापर वाढल्यामुळे कमी-कमी होत आहे.

* जलसाठय़ाचा सिंचनासाठी वापर
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र या दोन महिन्यात पावसाची सरसरी १५८.५ मिमीच्या वर वाढली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलपातळीत नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ७४ लघु प्रकल्प अशा एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८ टक्के जलसाठा होता; मात्र बर्‍याच ठिकाणी या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी सुरू असल्यामुळे जलसाठा झपाट्याने खालावत आहे.

 

Web Title: Corals fell on the dams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.