शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी प्रकरणाचा चेंडू राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:55 IST

मुख्याध्यापकाच्या कक्षातच परीक्षार्थीने पेपर सोडविल्याचे प्रकरण आता राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात पोहोचले आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जवळपास १६ वर्षापासून राज्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असले तरी अद्यापही कॉपी ही परीक्षेतून हद्दपार झाली नसल्याचे चित्र कायम असून देऊळगाव मही येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापकाच्या कक्षातच परीक्षार्थीने पेपर सोडविल्याचे प्रकरण आता राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात पोहोचले आहे.दरम्यान, यामध्ये शिक्षण मंडळ नेमकी कोणती कारवाई करते याकडे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या माध्यमिक शिक्षण विभागाने थेट या परीक्षा केंद्रावरील संचालक, उपसंचालक आणि पर्यवेक्षकांची उचलबांगडी करून त्यांना बारावीच्या परीक्षा प्रक्रियेपासून दुरू केले. त्यानंतर शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांनी या परीक्षा केंद्रावर तब्बल तीन तास वॉच ठेवला होता तर २९ फेब्रुवारी रोजी सोशल मिडीयात व्हायरल झालेल्या व्हीडीओ क्लीपच्या पार्श्वभूमीवर पेपर सोडविणारी ‘ती’ विद्यार्थीनी आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब घेतले आहेत. त्याचा अहवालही शनिवारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दोन सदस्यीय चौकशी समितीने सादर केला असल्याची माहिती खुद्द माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली.आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडू हा अहवाल राज्य शिक्षण मंडळ (बोर्डाकडे) पाठविण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले.तर कथितस्तरावर स्थानिक राजकीय व्यक्तीच्या ‘त्या’ मुलीने आधी लिहीलेला पेपर व परीक्षा संपल्यानंतर दिलेल्या अतिरिक्त वेळेत लिहिलेला पेपर याची शहानिशा करून त्यावर राज्य मंडळच निर्णय घेईल असे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझडे यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण जिल्ह्यात चर्चेचे ठरले आहे.

‘त्या’ तिघांवरही कारवाई करण्याचे निर्देशबारावीच्या केमेस्ट्रीच्या पेपरदरम्यान घडलेल्या या कॉपी प्रकरणात संबंधीत केंद्र संचालक तथा शिवाजी हायस्कूल देऊळगाव महीचे एस. एस. पवार, उपसंचालक जी. ए. मुंढे (स्वामी विवेकानंद हायस्कूल, दे. मही) आणि पर्यवेक्षक इंगळे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित संस्थांना दिले आहेत.

टॅग्स :ssc examदहावीbuldhanaबुलडाणाStudentविद्यार्थीexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकाल