बसचालकाला मारहाण, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 19, 2014 00:00 IST2014-10-19T00:00:51+5:302014-10-19T00:00:51+5:30
खामगाव येथे दारूच्या नशेत युवकाने बसचालकाला केली मारहाण, गुन्हा दाखल.

बसचालकाला मारहाण, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
खामगाव (बुलडाणा) : गाडी ओव्हरटेक करू दिली नाही, या कारणावरुन दारूच्या नशेत बसचालकाला मारहाण केल्याची घटना आज शनिवारी रात्री ७:३0 वाजेच्या सुमारास जुना बसस्थानकाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार खामगाव आगाराची एम.एच.४0-९१३५ ही भुसावळ ते अकोला एस.टी. बस शहरातील जुना बसस्थानका जवळ प्रवाशी उतरण्यासाठी थांबली असता पाठीमागून दुचाकीवर येणार्या योगेंद्र ठाकरे, रा.सुटाळा याने दारूच्या नशेत बसचालकाला गाडी ओव्हरटेक का करू दिली नाही, या कारणावरुन खाली ओढून मारहाण केली. अशा आशयाची तक्रार बसचालक पी. एस. सुरवाडे याने शहर पोलिस स्टेशनला दिली. दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.