शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

बुलडाणा जिल्हयात माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:02 IST

४ डिसेंबर २०१९ रोजी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण पूर्णत्वास येणार आहे. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: माध्यमिक शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाच्या दृष्टिकोनातून मागील तीन वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण अशा अविरत आॅनलाइन प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा दिनांक ५ नोव्हेंबर पासून राज्यभर सुरू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १०४३ माध्यमिक शिक्षक व २५ तालुका मास्टर ट्रेनर्स या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. ४ डिसेंबर २०१९ रोजी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण पूर्णत्वास येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण होत असून, बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत हे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षकांसाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन राबविले जात आहे. मानवी मेंदूची ओळख, अभ्यास करण्याच्या पद्धती,तणावमुक्त अध्ययन ,व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विषयांसह जीवनविषयक सकारात्मक बदल समजून घेत किशोरवयीन मुलांच्या वर्तनविषयक समस्या जाणून त्यावर उपाय योजनांचा समावेश या आॅनलाइन प्रशिक्षणात करण्यात आलेला आहे .अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी या योजनेत मोबाईल अ‍ॅपद्वारे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक -शिक्षिका प्रशिक्षणार्थी व मास्टर ट्रेनर्स सहभागी झालेले आहेत. अविरत-३ या आॅनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पाच मॉड्यूल देण्यात आले असून त्यामध्ये विविध माहितीपट, आॅडिओ-व्हिडिओ प्रकल्प, स्वमत आणि प्रश्नावली अशी पायरी पद्धत वापरण्यात आली आहे. कमी वेळात योग्य पर्याय निवडणाºया प्रशिक्षणार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कास्य ही आभासी सन्मान पदके मिळणार आहेत. त्यामुळे हे अविरत आॅनलाइन प्रशिक्षण सर्व माध्यमिक शिक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.        बुलडाणा जिल्ह्यातील अविरत-१ व अविरत-२ आॅनलाईन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माध्यमिक शिक्षकांसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास  संस्था बुलडाणाचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनात  व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्यावतीने या प्रशिक्षणाचे समन्वयन केले जात आहे .     

 प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांमध्ये नवीन दृष्टीकोन!

 आधुनिक जीवनशैलीत किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांमध्ये नवीन दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करत असतानाच मानसशास्त्रीय विश्लेषणातून विवेकनिष्ठ उपचार पद्धती अवलंबणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. व्यक्तीच्या भावना आणि वर्तनामध्ये दीर्घकाळ टिकणारे परिवर्तन घडवून आणून आनंददायी जीवन कसे जगता येईल  तसेच शिक्षक म्हणून आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करता येईल याचे मार्गदर्शन या प्रशिक्षणातून शिक्षकांना करण्यात येत आहे .      

 विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन! या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाºया तज्ज्ञ शिक्षकांना विशेष महत्त्व असून प्रशिक्षित शिक्षक हे आपल्या शाळांमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यासाठी सुलभकाची भूमिका बजावत आहेत. सर्व सहभागी शिक्षकांना दि. ४ डिसेंबर २०१९ पर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे. जिल्हा समन्वयक विभागप्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ .रवी जाधव यांचे मार्गदर्शनात  जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे व प्रवीण वायाळ हे प्रशिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांनी केले आहे .

 माध्यमिक शिक्षकांसाठी रंजक व नाविण्यपूर्ण पध्दतीने सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची संधी अविरत-३ या आॅनलाईन प्रशिक्षणात प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांनी आपल्या दैनंदिन अध्यापनात करावा.-डॉ. रवी जाधवजिल्हा समन्वयकअविरत तथा वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाEducationशिक्षण