नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू
By Admin | Updated: July 12, 2014 00:15 IST2014-07-11T23:43:51+5:302014-07-12T00:15:42+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ९ नगरपालिकेत २३ अर्ज

नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू
बुलडाणा : जिल्ह्यातील ९ नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या आज ११ जुलै रोजी शेवटच्या एकूण २३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यामुळे नगरपालिकेचे राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे.
बुलडाणा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे टि.डी.अंभोरे पाटील यांनी ४ अर्ज तर मो.सज्जाद खान यांनी २ अर्ज दाखल केले आहेत.
मेहकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या हसिना कासम गवळी व रंजना संजय म्हस्के यांनी प्रत्येकी दोन अर्ज सादर केले आहे. दोन्ही उमेदवार काँग्रेसचे असल्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
चिखली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शोभाताई सवडतकर तर भाजपाकडून पंडीतराव देशमुख यांनी अर्ज सादर केले.
नांदुरा येथे अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल आहे. यामध्ये भाजपाच्या पुष्पा लक्ष्मण झांबरे व सविता राजेश एकडे यांचा आहे. मलकापूर येथे नगराध्यक्ष पदाकरिता ३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हमीदाबी शे.मलंग, ज्योती विलास निमकर्डे, मंगला श्रीकृष्ण पाटील यांचा समावेश आहे.
जळगाव जामोद येथे नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी एका उमेदवाराने तीन तर एकाने एक अर्ज दाखल केला.भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपाचे रामदास बंबटकार यांनी आज तीन उमेदवारी अर्ज दाखल केले.