शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात दुषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:30 IST

बुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असतांना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दुषित पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असतांना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दुषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेच्या नळयोजनेद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. जोहर नगरमध्ये पाण्यात नारु आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पालिकेच्या नळयोजनेद्वारे सोडल्या जाणाºया पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसांपासून शहरात पिवळसर पाणीपुरवठा होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. येळगाव धरणात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. त्याद्वारे बुलडाणा शहर व आजूबाजूच्या १५ गावांना पाणीपुरवठा होत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. उपलब्ध जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील जोहर नगरमध्ये पाण्यात नारु आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.काँग्रेसच्या वतीने ३ जून रोजी पालिकेच्या कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नगर परिषद बरखास्त करण्याची मागणी केली. दोन वर्षांपासून शहरातील स्वच्छता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. नालेसफाईकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले. रमजान ईद सण जवळ आला असतांना शहरात साफसफाई व दिवाबत्तीची सोय नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरवासियांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी शुध्द करण्यासाठी दुय्यम दर्जाच्या बाबींचा वापर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरात यापुर्वीही पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र अशुध्द पाणीपुरवठा झाला नव्हता असे सांगत गेल्या काही दिवसांपासून शहराला दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरपालिका बरखास्त करावी किंवा प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, सुनील सपकाळ, जाकीर कुरेशी, आमीन टेलर, सुरेश सरकटे, योगेश परसे, चंद्रकांत चव्हाण, विलास खरे, अ‍ॅड. राज शेख, मो. अझहर, युसूफ खान, जुबेर खान, रियाज ठेकेदार हजर होते.

टॅग्स :Waterपाणीbuldhanaबुलडाणा