कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले

By Admin | Updated: October 12, 2015 01:12 IST2015-10-12T01:12:59+5:302015-10-12T01:12:59+5:30

बुलडाणा-मलकापूर मार्गावर ढाब्याजवळील घटना; एक मृत, एक गंभीर.

The container crashed into the two-wheeler | कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले

कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले

मोताळा (जि. बुलडाणा): बुलडाणा-मलकापूर मार्गावर राजूरनजीक वैष्णव ढाब्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव कंटेनरने मोताळय़ाकडे येत असलेल्या एका दुचाकीला धडक दिली. ही घटना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार शे. रफिक शे. रशीद (३0) जागीच ठार झाला, तर त्याचा सहकारी राष्ट्रपाल तेलंग (२४ दोघेही रा. मोताळा) गंभीर जखमी झाला आहे.
शे. रफिक शे. रशीद आणि राष्ट्रपाल तेलंग हे दोघे दुचाकी (क्रमांक एम. एच. २८ एल ७१६९) ने बुलडाणा येथून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राजूरनजीक वैष्णव ढाब्याजवळ कंटेनर (क्र मांक एच. आर. ३८ यू २0५५) च्या चालकाने भरधाव वाहनाची जोरदार धडक दुचाकीला दिली. या धडकेत शे. रफिक शे. रशीद हा जागीच ठार झाला, तर राष्ट्रपाल तेलंग गंभीर जखमी झाला. अपघात घड ताच कंटेनर घेऊन चालक पसार झाला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून कंटेनरसह चालकाला बुलडाणा ये थून ताब्यात घेतले. गंभीर जखमी राष्ट्रपालवर बुलडाणा येथे उपचार सुरू आहेत. मृतक शे. रफिक हा मूळचा रावेर तालुक्यातील असून, घरातील तो एकुलता कर्ता पुरूष होता. कोथळी ही त्याची सासरवाडी असून, मागील काही वर्षापासून मोताळा येथे मालवाहू ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत हो ता. त्याच्या पश्‍चात मुलगी, दोन मुले, पत्नी व आई-वडील आहेत.

Web Title: The container crashed into the two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.