श्रमदानातून केली बंधाऱ्याची निर्मिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:00 IST2019-04-02T16:59:41+5:302019-04-02T17:00:35+5:30
खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा(सालईबन) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचवेळी दोन दिवसीय श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.

श्रमदानातून केली बंधाऱ्याची निर्मिती!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा(सालईबन) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचवेळी दोन दिवसीय श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त भारत सरसकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंडळातंर्गत नेहरू युवा केंद्र बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद तालुक्यातील सालईनबन येथे शनिवारी आणि रविवारी स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये महात्मा गांधी लोकसेवा संघ आणि तरूणाई फांउडेशन खामगावाच्या पुढाकारातून १०० युवकांच्या श्रमदानातून दगडी बंधाºयाची निर्मिती करण्यात आली. यावेळी कार्यक्रम प्रमुख म्हणून डॉ. मनजीतसिंह शिख यांनी काम पाहीले. यावेळी नेहरू युवा केंद्र बुलडाणा जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते, अजयसिंह राजपूत, संतोष इटनारे, पाणी फांउडेशनचे ऋषिकेश ढोले यांनी मार्गदर्शन केले.