जयंत पाटील यांची सावरगाव येथे सांत्वनपर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST2021-02-12T04:32:41+5:302021-02-12T04:32:41+5:30

सावरगाव डुकरे येथील शंतनू पाटील हे राकाँ चिखली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तसेच सावकारी कायदा सुधारणा अभ्यास समितीचे सदस्य आहेत. ...

Consolation visit of Jayant Patil at Savargaon | जयंत पाटील यांची सावरगाव येथे सांत्वनपर भेट

जयंत पाटील यांची सावरगाव येथे सांत्वनपर भेट

सावरगाव डुकरे येथील शंतनू पाटील हे राकाँ चिखली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तसेच सावकारी कायदा सुधारणा अभ्यास समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या मातोश्री सुमंगल अ. पाटील यांचे ७३ व्या वर्षी वृद्धापकाळाने ३ फेब्रुवारीला निधन झाले. दिवंगत सुमंगल अ. पाटील या स्वातंत्र्यसेनानी तथा औरंगाबाद जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष पद्मश्री सखाराम पाटील यांच्या कन्या होत. तर चिखलीचे पहिले आमदार संतोषराव उपाख्य आप्पासाहेब पाटील यांच्या स्नुषा होत्या. चिखलीचे पहिले आमदार संतोषराव पाटील व ना. जयंत पाटील यांचे वडील स्व. राजाराम बापू पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते. या पृष्ठभूमीवर ना. जयंत पाटील यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान सावरगाव डुकरे येथे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत दाखल होत शंतनू पाटील व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Web Title: Consolation visit of Jayant Patil at Savargaon