समृद्धी महामार्गाला हजारो शेतक-यांची संमती
By Admin | Updated: March 11, 2017 01:39 IST2017-03-11T01:39:02+5:302017-03-11T01:39:02+5:30
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग; १ हजार १५0 हेक्टर जमीनीचे संमतीपत्र.

समृद्धी महामार्गाला हजारो शेतक-यांची संमती
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. १0- मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गामध्ये शेतकर्यांची हजारो एकर शेतजमीन जात असल्याने सुरूवातीला अनेक शेतकर्यांचा या महामार्गासाठी विरोध होता. मात्र, आता समृद्धी महामार्गासाठी शेतकरी संमती दर्शवत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५२ शेतकर्यांनी ११५0.४२ हेक्टर जमीनीचे समृद्धी महामार्गाकरिता संमतीपत्र दिले आहे.
दळण- वळणाचा मार्ग सुकर करण्याबरोबरच मोठी शहरे ग्रामीण भागाशी जोडण्याकरिता शासनाने नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग हाती घेतला आहे. मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृध्दी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातून जात आहे. या महामार्गामध्ये शेतकर्यांच्या हजारो हेक्टर शेतजमीनी जात आहेत. जमिनी देणार्या शेतकर्यांसाठी शासनाने विविध स्वरूपातील योजना आखल्या आहेत. मात्र, सुरूवातील मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाची मोजणी अडवून शेतकर्यांनी मोठय़ाप्रमाणावर विरोध केला. विरोध करणार्या शेतकर्यांचे मन वळविण्याचा सर्वकष प्रयत्न प्रशासकीय पातळीवरून केला जात असून, जिल्ह्यातील जवळपास ५५ टक्केपेक्षा अधिक संयुक्त मोजणी झालेली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यातून हा रस्ता जात आहे. या महामार्गासाठी सुरूवातीला शेतकर्यांचा कडाडून विरोध झाला असला तरी आतापर्यंंंत १ हजार ५२ शेतकर्यांनी ११५0.४२ हेक्टर जमीनीचे संमतीपत्र शासनाकडे दिले आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील ४४५ शेतकर्यांनी ५३0.५७ हेक्टर जमीनीचे संमतीपत्र समृद्धी महामार्गाकरिता दिले आहे. लोणार तालुक्यातील १५३ शेतकर्यांनी १३२.६0 हेक्टर शेतजमीनीचे संमतीपत्र दिले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील २८८ शेतकर्यांनी ३३३.0४ हेक्टर शेतजमीनीचे संमतीपत्र व देऊळगाव राजा तालुक्यातील १६६ शेतकर्यांनी १५४.२१ हेक्टर जमीनीचे संमतीपत्र समृद्धी महामार्गाकरिता शासनाकडे दिले आहे. सुरूवातील समृद्धी महामार्गाकरिता विरोध झाला तरी आता हजारो शेतकर्यांनी या महामार्गासाठी संमती दर्शवली आहे. शेतकर्यांच्या शेतजमीनी या महामार्गात जात असल्याने संमतीपत्र देणार्या या शेतकर्यांना शासनाच्या ठोस मदतीची अपेक्षा आहे.