लाच घेतल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिकास अटक

By Admin | Updated: April 28, 2017 01:30 IST2017-04-28T01:30:37+5:302017-04-28T01:30:37+5:30

बुलडाणा : येथील समाज कल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली.

In connection with the bribe, the junior script writer was arrested | लाच घेतल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिकास अटक

लाच घेतल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिकास अटक

बुलडाणा : येथील समाज कल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील ग्रामस्थाने बुलडाणा येथील एसीबी कार्यालयात तक्रार दिली की, त्यांच्या पत्नीचे किन्ही महादेव शिवारात १.९९ हे.आर.शेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत १७ एप्रिल रोजी शासनास खरेदी करुन देण्यात आले. उर्वरीत २० टक्के रकमेचा धनादेश व खरेदीची नक्कल देण्याकरीता ए. एस. इंगळे २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरुन २७ एप्रिल रोजी एसीबीने दिलेल्या ठिकाणी साफळा रचला असता, कनिष्ठ लिपीक इंगळे यास तक्रारदाराकडून१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

Web Title: In connection with the bribe, the junior script writer was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.