मनरेगा योजनेला कृषी क्षेत्राशी जोडा - जाधव

By Admin | Updated: July 21, 2016 00:51 IST2016-07-21T00:51:25+5:302016-07-21T00:51:25+5:30

लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी खा. जाधव यांनी उपस्थित केला मुद्दा.

Connect MNREGS to the agricultural sector - Jadhav | मनरेगा योजनेला कृषी क्षेत्राशी जोडा - जाधव

मनरेगा योजनेला कृषी क्षेत्राशी जोडा - जाधव

बुलडाणा : सलग दोन वर्ष दुष्काळाशी महाराष्ट्र सामना करतोय. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबायला तयार नाही. अनेक उपाययोजना शासन राबवतय, मात्र मुळापर्यंंत मदतीचा ओघ कमी पडतोय. यासाठी मनरेगा अर्थात ह्यमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाह्ण कृषी क्षेत्राशी जोडण्याची आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी २0 जुलैला लोकसभेत केली. राजधानी दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शेती व्यवस्थेशी नाळ जुळलेली असल्यामुळे कायम शेतकरी आणि त्याचे जीवनमान याबाबत खा. प्रतापराव जाधव आग्रही भूमिका घेत आहेत. आजही लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी मनरेगासारखा १00 दिवसांचा रोजगार उपलब्धीची योजना कृषी क्षेत्रात जोडण्याचे अभ्यासपूर्ण विवेचन खा. जाधव यांनी केले. यावेळी ते म्हणाले, की ग्रामीण भागातील अकुशल लोकांना १00 दिवसांचा रोजगार देण्यासाठी मनरेगा काम करते. कमीतकमी १00 दिवसांचा रोजगार न मिळाल्यास घरबसल्या मजुरीची व्यवस्थादेखील या योजनेतून आहे. दुर्दैवाने बिहार, यूपी, राजस्थान व इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या शेतकरी आत्महत्येचे लोन पसरलेल्या राज्यात मनरेगाचा खर्च २५ टक्क्यापेक्षाही कमी आहे. पाहिजे तेवढी रोजगार उपलब्धी झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना गावपातळीवर काम मिळत नाही. पर्यायाने हाताला काम शोधत ग्रामीण जनतेचे लोंढेच्या लोंढे शहराकडे धाव घेत आहेत. शेतीला मनरेगाची जोड दिल्यास कृषी क्षेत्रात अकुशल लोकांना गावपातळीवरच रोजगार उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे अकुशल लोकांना रोजगार देणारी सगळय़ात मोठी व्यवस्था कृषी क्षेत्रात उपलब्ध आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे. या योजनेला शेतीची जोड दिल्यास शेतकर्‍यांचा लाग-लागवड खर्च कमी होईल. उत्पन्न वाढण्यासही मदत होईल आणि अकुशल लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने मनरेगाचा हेतूदेखील चांगल्या अर्थाने सफल होईल. आज शेतात मजूर मिळत नाहीत. मनरेगामुळे गावातच काम आणि १00 दिवसांची हमी, असा योग साधून शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीमुळे आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल, असा मुद्दा खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत मांडला. मनरेगासारखी देशपातळीवरील कोट्यवधींचा निधी उपलब्ध असलेली योजना कृषी क्षेत्राशी जोडल्यास संपूर्ण देशभरात शेतकरी, शेतमजूर सुखावला जाईल, असेही यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले.

Web Title: Connect MNREGS to the agricultural sector - Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.