कृषी कायद्यांना स्थगितीचे काँग्रेसकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:12+5:302021-01-14T04:28:12+5:30
मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अंजना चौक येथे काँग्रेसच्या वतीने फटाके, नारेबाजी व पेढे वाटून आनंद व जल्लोष करण्यात आला. ...

कृषी कायद्यांना स्थगितीचे काँग्रेसकडून स्वागत
मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अंजना चौक येथे काँग्रेसच्या वतीने फटाके, नारेबाजी व पेढे वाटून आनंद व जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर म्हणाले की, गेल्या साठ दिवसांपासून चाललेल्या शेतकरी आंदोलनाला व काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या पाठिंब्याचा हा फार मोठा विजय आहे, हा कायद्याचा विजय आहे. याबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा आदरपूर्वक स्वागत करून शेतकरी बांधवांना मिळालेल्या दिलाशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे उद्गार काढले. यावेळी ॲड.अनंतराव वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शहराध्यक्ष कलीम खान, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, ज्येष्ठ नेते दिगंबरराव मवाळ, सेवादलाचे नेते शैलेश बावस्कर, प्रा.डी.जी. गायकवाड, संजय म्हस्के, किशोर गवई, युनुस पटेल, वैभव उमाळकर, अक्षय इनकर, आशुतोष तेलंग, सार्थक दीक्षित, नारायण पचेरवाल, रवी मिस्कीन, जाकीर बागवान, ॲड.सी वाय जाधव, ॲड.गोपाल पाखरे, आशिष बापू देशमुख, धर्मा बनचरे, छोटू गवली, जमील अहमद, शाहू गवली, मुनाफ खान, नारायण इंगळे, आकाश अवसरमोल, एकनाथ गवई, सादीक बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.