स्वबळावर वाढते काँग्रेसचे बळ
By Admin | Updated: September 27, 2014 00:17 IST2014-09-27T00:11:06+5:302014-09-27T00:17:58+5:30
१९९९ च्या निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसने जिंकल्या होत्या तीन जागा.

स्वबळावर वाढते काँग्रेसचे बळ
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वेळी आघाडी व युती स्वबळाची भाषा करते व शेवटच्या क्षणी एकत्र येत निवडणुकीला समोरे जातात. यावेळी मात्र या युती व आघाडीचे संसार विस्कटले असुन प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा जात आहे. तब्बल २५ वर्षानंतर युती प्रथमच वेगळी झाली असुन आघाडीला १९९९ मधील निवडणुकीत स्वबळाचा अनुभव आहे. या निवडणुकीचा मागोवा घेतला असता स्वबळावर काँग्रेसचे बळ वाढलेलेच दिसुन आले असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे आता येणारी निवडणुक कुणाचे ह्यबळह्ण किती याकडे लक्ष लागणार आहे.
१९९९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुक लढविण्याचा निर्णय घेऊन मित्र पक्षासोबतच भाजप-सेनेलाही आव्हान उभे केले होते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बळ वाढले, बुलडाणा, जलंब तसेच खामगाव मध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला होता.
राष्ट्रवादीला सिंदखेडराजामध्ये तर सेनेला फक्त मेहकर मध्ये यश हाती लागले. मलकापूर व चिखलीत भाजपाने आपला गड कायम राखला. या निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी एकसंघ लढत आली, मात्र काँग्रेसच्या यशाचा पारा खाली उतरला व राष्ट्रवादी सुद्धा एक या संख्येवर आजतागायत कायम आहे. आघाडीच्या एकसंघतेला जोरदार आव्हान देत युतीने भरारी घेऊन नंतरच्या काळात सेना-भाजपाचे आमदार वाढले. लोकसभेतही सेना भाजपालाच यश मिळत गेले.