कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:59 IST2018-04-05T18:48:54+5:302018-04-05T18:59:51+5:30
शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा
शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६ एप्रिल रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
या शिबीरात अखिल भारतीय कॉंग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष, खा.अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषद विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष ना.माणिकराव ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबीरात प्रमुख मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री वसंतराव पुरके, सोशलमिडीयाचे प्रदेशसरचिटणीस अभिजित सपकाळ हे करणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड.गणेश पाटील, संजय राठोड, समन्वयक श्यामभाऊ उमाळकर, सहसमन्वयक सत्संग मुंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्यांनी या विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)