शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: June 10, 2017 01:59 IST

जिल्हा मार्केटिंग अधिका-यांना कागदपत्रांसह उचलून आणले!

बुलडाणा : तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंंत खरेदी केली जाईल, हे शासनाने दिलेले आश्‍वासन मोडीत काढीत तूर खरेदी बंद केल्यामुळे आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी व काँग्रेस कार्यक र्त्यांंनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात जाब विचारण्याकरिता धडक दिली. मात्र, संबंधित अधिकारी उत्तर देऊ न शकल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांंनी जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांना कागदपत्रांसह वाहनात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह १४ जणांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी शासनातर्फे संबंधित अधिकार्‍यांनी तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंंत खरेदी केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यानंतर अचानक तूर खरेदी बंद करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे ४ लाख २0 हजार क्विंटल तूर पडून आहे. याचा जाब विचारण्याकरिता आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्ते व शेतकर्‍यांसह जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतरही जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे आ. सपकाळ यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी व सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे चर्चेसाठी आणले. येथे जिल्हाधिकार्‍यांपुढे तूर विक्री करणार्‍या शे तकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाबाबत माहिती दिली. शेतकर्‍यांचा तुरीचा शेवटचा दाणा असेपर्यंंत तूर खरेदी करू, असे आश्‍वासन सरकारने दिले होते, याची आठवण आ. सपकाळ यांनी करून दिली. यावर जिल्हाधिकार्‍यांनी सदर बाब शासनाला कळवितो व बंद झालेल्या तूर खरेदीबाबत सकारात्मक निर्णय घेतो, असे आश्‍वासन दिले. त्यावर सोमवारी सकारात्मक निर्णय झाला नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. यावेळी आ. हर्षवर्धन सपकाळ, संजय पांढरे, सत्येंद्र भुसारी, विष्णू पाटील, जि. प. सदस्य जयश्री शेळके, रसूल खान, सुनील तायडे, अँड. शरद राखोंडे, अमोल तायडे, आरिफ खान, प्रभाकर वाघ, झाकीर कुरेशी, दत्ता काकस, गजनफर खान, अँड. विजयसिंग राजपूत, रिजवान सौदागर, मो. शाफिक, साहेबराव चव्हाण, रघुनाथ नरोटे, चेतन पानसर, योगेश परसे, इरफान पठाण, विक्रम देशमुख, नीलेश जाधव, इजाज खान, सुरेश बोचरे, अँड. शेख, बबलू मावतवाल, रियाज ठेकेदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.