काँग्रेस कमिटीचा उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: June 15, 2014 23:57 IST2014-06-15T23:55:31+5:302014-06-15T23:57:33+5:30
तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे.

काँग्रेस कमिटीचा उपोषणाचा इशारा
सिंदखेडराजा : भारतीय स्टेट बँकेत गत अनेक वर्षापासून कार्यपद्धतीवर टिका होत असूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीही दखल घेण्यास तयार नाहीत. कर्मचार्यांच्या कार्यपद्धतीत १९ जूनपर्यंत सुधारणा झाली नाही. तर २0 जून पासून तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे. गत दोन महिन्यापासून साखरखेर्डा शाखेत गारपीटग्रस्त साखरखेर्डा, सवडद, शिंदी, राताळी, मोहाडी, पिंपळगाव सोनारा, गुंज, वरोडी, शेवगा जहॉगीर, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, सायाळा, लिंगा, शेंदुर्जन, राजेगाव, दरेगाव, तांदुळवाडी, लव्हाळा, मोहखेड, हिवरा गडलिंग, हनवतखेड येथील ५ हजार ६६५ खातेदारांचे ५ कोटी रुपये येऊन पडले आहेत. यातील काहींना मदत मिळाली तर काही शेतकर्यांचे पैसेच जमा झाले नाहीत. पेरणीचे दिवस जवळ असले असतांना शासनाची मदत नाही आणि नविन कर्जासाठी सुरुवात नाही. यासाठी शेतकर्यांना पीककर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे, बँकेत स्वच्छता गृह, वृद्ध, महिला, विद्यार्थी यांना बँकेत स्वतंत्र काऊंटर सुरु करावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. येथील एटीएम मशिन नेहमी बंद अवस्थेतच दिसून येते. एटीएम मशिन चोवीसतास सुरु ठेवण्याची मागणीही ग्राहकांमधून होत आहे. शाखा व्यवस्थापक सुभाष लाड यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. केवायसीची पुर्तता न झाल्याने अनेक खातेदारांचे खाते गोठविण्यात आले आहेत. काही खातेदारांनी केवायसीची पुर्तता केल्यानंतरही त्यांची अडवणूक होत आहे. पैसे काढतांना नाहक त्रास ग्राहकांना मिळतो. या सर्व प्रकारणाची वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी केली आहे.