काँग्रेस भीमशक्तीच्या वतीने बुद्ध जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST2021-05-27T04:35:59+5:302021-05-27T04:35:59+5:30
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिसरण पंचशील घेऊन भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ...

काँग्रेस भीमशक्तीच्या वतीने बुद्ध जयंती साजरी
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिसरण पंचशील घेऊन भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, मेहकर विधानसभा मतदार संघाचे पक्षनेते ॲड.अनंतराव वानखेडे, राज्य सरचिटणीस भीमशक्ती भाई कैलास सुखधाने, मेहकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कलीम खान, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे सचिव वसंतराव देशमुख, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष भूषणभैया देशमुख, किसान काँग्रेसचे अध्यक्ष विनायक टाले, प्रा.विनोद पऱ्हाड, माजी नगरसेवक संजय म्हस्के, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष युनूस पटेल, छोटू गवली, रियाज कुरेशी, सुखदेव ढाकरके, मुनाफ खान, धर्मा बनचरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन प्रा.संजय वानखेडे यांनी केले, तर आभार नारायण इंगळे यांनी मानले.