काँग्रेसने वाटल्या तुरीच्या घुगर्या !
By Admin | Updated: May 7, 2017 02:22 IST2017-05-07T02:22:14+5:302017-05-07T02:22:14+5:30
शेगाव येथे काँग्रेसद्वारे शासनाच्या तूर खरेदी धोरणाचा निषेध

काँग्रेसने वाटल्या तुरीच्या घुगर्या !
शेगाव (जि. बुलडाणा): शासनाच्या तूर खरेदी धोरणार्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शनिवारी शेगावात घुगर्या वाटप आंदोलन करण्यात आले. स्थानिक शिवाजी चौकात आयोजित या अनोख्या आंदोलनात शेतकर्यांनीही सहभाग दिला.
शासनाने शेतकर्यांच्या तुरीची खरेदी शासनाने पुन्हा सुरू करावी अन्यथा शेतकर्यांना त्यांच्या घरातील तूर शिजवून त्याच्या घुगर्या करून शेजार्यांना वाटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. हे शासनाला सुचविण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी स्थानिक शिवाजी चौकात तूरीच्या घुगर्या शिजवून त्या नागरीकांना वाटून शासनाविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष अशोक हिंगणे, शहराध्यक्ष केशवराव हिंगणे, नगरसेवक शिवाजी बुरुंगले, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, नगरसेवक शे. नईम, अमित जाधव, माजी शहराध्यक्ष अन्सार अहेमद सिद्दीकी, माजी नगरसेवक संदीप काळे, सावळे, पवन पचेरवाल यांची उपस्थिती होती.