लसीकरण केंद्रात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST2021-05-06T04:36:50+5:302021-05-06T04:36:50+5:30

तीन दिवसापासून लस नसल्याने येथील लसीकरण बंद होते. मंगळवारी दुपारी २ वाजता येथील केंद्रावर लस उपलब्ध होताच अनेकांना याची ...

Confusion at the vaccination center | लसीकरण केंद्रात गोंधळ

लसीकरण केंद्रात गोंधळ

तीन दिवसापासून लस नसल्याने येथील लसीकरण बंद होते. मंगळवारी दुपारी २ वाजता येथील केंद्रावर लस उपलब्ध होताच अनेकांना याची माहिती मिळाली आणि अवघ्या अर्ध्या तासात केंद्रावर शेकडोंनी गर्दी केली होती. या केंद्रावर शहरातील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जात असली तरीही ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने लोक येथे आल्याने एकच गोंधळ उडाला. समज-गैरसमज वाढल्याने आणि त्यातच आपलाही नंबर लागावा, यासाठी लोकांनी लावलेल्या रांगा मोडून लसीकरण केंद्राच्या मुख्य दरवाजाजवळच गोंधळ घातला होता. यात दरवाजाच्या काचा फुटल्याने अखेर आरोग्य व्यवस्थेला पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्यावर गर्दी कमी झाली होती. बुधवारी दिवसभरात २०० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले.

नागरिकांनी गोंधळ करू नये, लस सर्वांना मिळणार आहे, मात्र जसा पुरवठा होईल तसे लसीकरण करण्यात येणार आहे. लोकांनी विनाकारण केंद्रावर गोंधळ करू नये.

डॉ. सुनीता बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक, सिंदखेड राजा.

Web Title: Confusion at the vaccination center