बहुरंगी लढतीत प्रतिष्ठेची टक्कर
By Admin | Updated: September 28, 2014 00:24 IST2014-09-28T00:24:02+5:302014-09-28T00:24:02+5:30
चिखली विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र.

बहुरंगी लढतीत प्रतिष्ठेची टक्कर
सुधीर चेके पाटील / चिखली
गत पंधरा दिवसांपासूनचे युती, आघाडीचे चर्चेचे गुर्हाळ ह्यनवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजेह्ण या प्रवृत्तीतून सुरू होते. ते गुरुवारी संपल्याने चिखली विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र उभे राहिले आहे.
चिखली मतदारसंघाकडे ह्यपॉलिटिकल हबह्ण म्हणूनच पाहिल्या जाते. अनेक मोठय़ा राजकारण्यांना राजकारणाचे धडे या मतदारसंघाने घालून दिले आहेत. हा मतदारसंघ परिवर्तन तत्काळ स्वीकारतो. नवख्यांना अलगद कवेत घेतो, तर जुन्यांना हलकेच बाजूला सारतो. तर कधी जुन्यांना झळाळी देतो. असेच काहीसे जुने चित्र परत या मतदारसंघात नव्या पिढीला एका तपानंतर पाहावयास मिळत आहे.
युती, आघाडी तुटल्याने दोन दांडावरून न वाहणारे पाणी आता चार दांडातून वाहताना दिसू लागल्याने मतदार राजा नव्या परिवर्तनाच्या आशेने सुखावला आहे. पूर्वी युतीच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेचा एकच उमेदवार असायचा. आता भाजपाचे सुरेश खबुतरे व शिवसेनेचे डॉ. प्रताप राजपूत तसेच आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकच उमेदवार असायचा आता काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे, तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार धृपतराव सावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. याशिवाय मनसेकडून विनोद खरपास, भारिप बमसंकडून विजय खरात, इमरान खान उमरखान, राजेश गवई, जालींधर बुधवत, श्रीराम सपकाळ, दत्ता संतोषराव गवळी, एकनाथ जाधव, देविदास जाधव, पद्मनाथ बाहेकर, देवानंद गवई, दत्ता खरात, नवृत्ती जाधव, प्रदीप अंभोरे, दगडू साळवे, गणेश बाहेकर, मो. तौफिक मो. हाफिज, सविता बाहेकर, प्रमोद पाटील, विशाल भंडारे, विलास शेगावकर, तुषार गुजर आणि अयाज अहेमद हबीब अहेमद कुरेशी अशा एकूण २७ उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
गत आठवड्यापूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून ऊर फाटेस्तोवर गुणगाण करणारे आता परस् परांवर कशी चिखलफेक करतात, हे पाहणे मोठे रंजक होणार आहे. परिणामी एकमेकांचे गुणगाण करणारे आता उणेदुणे काढताना दिसणार, यात शंका नाही. सोबतच या बहुरंगी निवडणुकीमुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे त्यामुळे मतदारांचेही भाव चांगलेच वधारले असून, गावपुढार्यांसाठी खर्या अर्थाने सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. ही लढत उमेदवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेची झाली असून, जातीय समीकरणांचीही गणिते मांडली जात असल्याचे चित्र आहे.