बुलडाणा जिल्हय़ात १५ एप्रिलला संघर्ष यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 00:08 IST2017-04-11T00:08:33+5:302017-04-11T00:08:33+5:30
सर्वपक्षीय बैठकीत आवाहन; शेतकरी, सामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे अवाहन.

बुलडाणा जिल्हय़ात १५ एप्रिलला संघर्ष यात्रा
चिखली : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, हा त्यांचा अधिकार असून, त्यांच्या वारसदारांना न्याय मिळालाच पाहिजे. मात्र, राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करू, अशी घोषणा करूनही अद्यापपर्यंंत कर्जमाफी न दिल्याने शेतकरी आत्महत्या वाढतच आहे. त्यामुळे निद्रीस्त शासनाचे डोळे उघडण्यासाठी व शेतकर्यांना न्याय मिळून देण्यासाठी संयुक्त संघर्ष यात्रेतील दुसर्या टप्प्यातील यात्रा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून १५ रोजी काढण्यात येणार असून, सकाळी १0 वाजता सिंदखेडराजा येथे, तर दुपारी ३ वाजता बुलडाणा येथे आयोजित सभा यशस्वी करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
विविध विरोधी पक्षांनी एकत्न येऊन राज्यात काढलेली शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्ना १५ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हय़ातून काढण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेच्या पूर्वतयारीसाठी बुलडाणा येथील गांधी भवनात ८ एप्रिल रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, पीरिपा (कवाडे गट), शेतकरी संघटना, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आदी पक्षाच्या प्रमुख नेते मंडळीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भारत बोंद्रे होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, रेखाताई खेडेकर, श्याम उमाळकर, नाजेर काझी, विजय अंभोरे, संगीतराव भोंगळ, शेकापचे अँड.दत्ता भुतेकर, शेतकरी संघटनेचे डॉ.हसनराव देशमुख, एकनाथराव थुट्टे, पीरिपाचे राजा सावळे, समाजवादी पक्षाचे शे. आसिफ, अँड.साहेबराव सरदार, मुक्त्यारसिंग राजपूत, संजय राठोड, नाना कोकरे, समाधान हेलोडे, रियाजखॉ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीचीही बैठक
विविध विरोधी पक्षांनी एकजुटीची मूठ बांधून शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्नेच्या रुपाने पुकालेले आंदोलन जिल्हय़ात यशस्वी व्हावे, यानुषंगाने ८ एप्रिल रोजी बचत भवन बुलडाणा येथे जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघर्ष यात्रा व सभेबाबतचे नियोजन ठरविण्यात आले.